सरकारी कार्यालयामध्ये नागरिकांनी फोटो- व्हिडिओ काढणे ; बाबत सरकारचे आदेश…

Spread the love

Mh-Tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Government orders regarding citizens taking photos and videos in government offices ] : सरकारी कार्यामध्ये नागरिकाकडून फोटो , व्हिडिओ काढणे या संदर्भात सरकारकडून महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आले आहे .

खऱ्या अर्थाने जनता ही देशाचे खरे मालक आहे , यामुळे संविधानात दिलेल्या हक्क , अधिकार नुसार सरकारी कार्यालयामध्ये सुरू असलेले कामकाज संदर्भात फोटो , व्हिडिओ काढण्यास कर्मचाऱ्यांकडून मनाई केली जाऊ शकत नाही . परंतु गोपनीय विभाग मधील फोटो , व्हिडिओ काढण्यास मनाई कायम असेल .

भारतीय संविधानाच्या कलम 19(1) नुसार नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याचबरोबर माहिती मिळवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे . त्याचबरोबर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार नागरिकांना सरकारी कार्यालयीन कामकाज , इलेक्ट्रॉनिक माहिती , नोंदी इ. माहिती मिळवण्याचा अधिकार आहे .

याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या सण 1963 , 1994 व 2017 साली देण्यात आलेल्या निर्णयानुसार , नागरिकांना सरकारी कामकाज विषयक माहिती मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे . यानुसार नागरिक कोणत्याही सरकारी कार्यालयात ( गोपनीय विभाग वगळता ) जावून फोटो , व्हिडिओ शूटिंग करू शकता .

यानुसार सरकारच्या विविध विभागाकडून आदेश निर्गमित करून , नागरिकांना फोटो , व्हिडिओ काढण्यास मनाई करू शकत नाही . नुकतेच नाशिक विभाग मार्फत या संदर्भात आदेश निर्गमित करण्यात आले आहे .

ऑर्डर करण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment