Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Will the mandatory TET exam be cancelled? Teachers’ unions hold Maha Elgar Morcha.. ] : टीईटी विरोधात शिक्षक संघटनांचा महाएल्गार आक्रोश मोर्चा दि.05.12.2025 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे .
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टीईटी परीक्षा अनिवार्यता बाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत . परंतु याकरीता राज्य सरकारने देखिल शिक्षकांची बाजु न्यायालयात मांडावी . याकरीता सदर महाएल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेत .
महाराष्ट्रभर महाएल्गार : दि.05.12.2025 रोजी शिक्षकांचा टीईटी परीक्षा अनिवार्यतेच्या विरोधात महाएल्गार मोर्चा आयोजित करण्यात आल्याने , दि.05.12.2025 रोजी राज्यभरातील शाळांना सुट्टी असणार आहे .
याशिवाय दि.01.11.2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करण्यात यावी , आश्वासित प्रगती योजना / निवडश्रेणी , पदोन्नतीचे प्रश्न तातडीने सोडण्यात यावेत . अशीही मागणी करण्यात येणार आहे .
सदर महाएल्गार राज्यातील सर्वच शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना एकत्र येवून करणार आहेत . यामुळे शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे .
टीईटी अनिवार्यता रद्द होणार का ? सदर टीईटी अनिवार्यतेचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असून , सदर निकालाच्या विरोधात पुनर्विचार याचिका मोठ्या प्रमाणात दाखल करण्यात आल्याने , सर्वोच्च न्यायालयाने एक समिती गठण करण्यात आले आहे .
सदर गठीत समिती यावर निर्णय घेणार आहे .निश्चितच नोकरीनंतर ( कायम सेवेनंतर ) अशा प्रकारचे अनिवार्यता करणे अयोग्य आहे . असे अनेकांचे म्हणणे आहे . यामुळे निश्चित पुनर्विचार मध्ये शिक्षकांच्या बाजुने निकाल दिला जाईल असे तज्ञांचे मत आहे .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !