दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Three major, highly significant Government Resolutions issued on June 19, 2026, regarding state officers and employees. ] :  दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.वित्त विभाग : लेखा व कोषागारे संचालनालय या क्षेत्रीय कार्यालयातील दुरध्वनी चालक ( गट क ) , लघुलेखक निम्नश्रेणी ( गट ब अराजपत्रित ) , लघुलेखक उच्चश्रेणी ( गट ब अराजपत्रित ) व लघूटंकलेखक ( गट क ) या संवर्गातील पदे मृत संवर्ग घोषित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

02.महसुल व वन विभाग : अतिरिक्त कार्यभार सांभाळल्याबाबत अतिरिक्त कार्यभाराचे वेतन मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव विहीत वेळेत शासनास सादर करण्याबाबत मंजूरी देण्यात आली आहे .

03.सामान्य प्रशासन विभाग : भाप्रसे अधिकाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी अंतिम प्रदान रकमेबाबतचे प्रस्ताव सेवार्थ प्रणालीतुन महालेखापाल कार्यालयास सादर करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .

या संदर्भातील 03 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment