राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ A highly important Government Resolution (GR) issued for state pensioners on 20.06.2026.] : राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी मोबाईल ॲप कार्यान्वित करणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.19.06.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , निवृत्तीवेतन धारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध माहिती व सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यासाठी MAHA-UPLABDHI हे मोबाईल ॲप दि.01.07.2026 पासुन कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे .

Maha-UPLABDHI विस्तारित अर्थ Maharashtra unified pension labh digital hub & information असे आहे . सदर ॲपद्वारे निवृत्तीवेतन धारक , कुटंब निवृत्ती वेतनधारकांना निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध डिजिटल सेवा एकाच मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत .

तसेच Maha-uplabdhi या मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत . Maha-uplabdhi या मोबाईल ॲपची अंमलबजावणी टप्याटप्याने करण्याचे प्रस्तावित असून प्रथम टप्यात मुलभुत अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत .

सदर मोबाईल ॲपचे प्रमुख उद्दिष्ट्य : निवृत्तीवेतन धारकांना सिंगल डिजिटल प्लॅटफार्मद्वारे सेवा उपलब्ध करुन देणे . निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती त्वरित , अचुक व पारदर्शक स्वरुपात उलब्ध करुन देणे , अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व कोषागार कार्यालयांवरील प्रत्यक्ष भेटींची आवश्यकता कमी करणे .

निवृत्तीवेतनधारकांना सुलभ , वापरण्यास सोपी व सुरक्षित डिजिटल प्रणाली उपलब्ध करुन देणे , अधिदान  लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालयांडून द्यावयाच्या सुचना व निवृत्तीवेतन विषयक माहिती वेळेवर उपलब्ध करुन देणे .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment