शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution dated 16.06.2026 regarding the delegation of authority to disburse salary arrears of teaching and non-teaching staff. ] : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत दिव्यांग सक्षमीकरण विभाग मार्फत दि.16.06.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळा इ. मधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्यापुर्वी सदर थकबाकीची रक्कम देय आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत . वित्तीय अधिकार नियम ..

पुस्तिकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी , मुंबई शहर / उपनगरयांना थकीत वेतन अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत .

तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी मुख्‍य लेखा व वित्त अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन थकीत वेतन निधी वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच मुंबई शहर / उपनगर करीता जिल्हाधिकारी यांनी लेखाधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन थकीत वेतन प्रस्तावास मंजूरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच यापुर्वी ज्या प्रकरणात थकबाकीची रक्कम अदा केलेली आहे , ती रक्कम नियम प्रमाणे अदा करण्यात आली आहे किंवा कसे , याबाबतची सविस्तर तपासणी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण , आयुक्तालय पुणे यांच्या विशेष तपासणी करुन त्याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनांस 90 दिवसांत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment