किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding significant improvements to Casual Leave and Compensatory Leave. ] : किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा करणे संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.15.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अधिकारी / कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थिती व रजेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत , तथापि असे निदर्शनास आले आहे कि , काही अधिकारी  / कर्मचारी हे 8 पेक्षा अधिक नैमित्तिक रजा उपभोगत असून , गट ब ( राजपत्रित ) ..

संवर्गातील काही अधिकारी बदली रजा मंजूर करण्याची मागणी करीत आहेत , यास्तव , नैमित्तिक रजा व बदली रजेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

अधिकारी / कर्मचारी यांनी एका कॅलेंडर वर्षात 8 पेक्षा अधिक नैमित्तिक रजा उपभोगल्यानंतर पुढील प्रत्येक एक दिवसाच्या अनुपस्थितीसाठी त्यांचे मागणीनुसार अर्जित रजा  ( अर्जित रजा खाती शिल्लक असल्यास ) मंजूर करण्यात येईल .

तसेच गट ड व गट ब ( अराजपत्रित ) संवर्गातील कर्मचारी वगळता इतर सर्व अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदली रजा अनुज्ञेय होणार नाही , असे नमुद करण्यात आले आहेत .

Leave a Comment