Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 19.12.2025 regarding implementation of revised pay scale ] : वेतन समानीकरणच्या ( 4 था वेतन आयोग ) अहवालानुसार , सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयांमध्ये स्वीय सहायक संवर्गाचे पद निर्माण करण्यात येवून त्यास मंत्रालयीन निवडश्रेणी लघुलेखकांची वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे .
तसेच वेतनत्रुटी निवारण समिती 2024 ( खुल्लर समिती ) च्या शिफारशीनुसार वित्त विभागाच्या दिनांक 02 जुन 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ व पोलिस महासंचालक कार्यालयातील स्वीय सहायक या संवर्गाला एस – 16 44900-112400 ऐवजी एस – 17 , 47600-151100 वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे .
त्याच धर्तीवर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 18 डिसेंबर 1995 नुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांमधील स्वीय सहाय्यक या संवर्गाला एस – 16 , 44900-142400 ऐवजी एस 17 , 47600-151100 अशी वेतनश्रेणी लागु करण्यात आली आहे .
सदर निर्णय हा वित्त विभागाच्या दिनांक 02 जुन 2025 मध्ये नमुद करण्यात आलेल्या तरतुदीच्या जशाच्या तसे तरतुदी लागु करण्यात आले आहे .

- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !