CTET परीक्षेत परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्तता करणेबाबत ..

Spread the love

Mh-tv संगीता पवार प्रतिनिधी [ Regarding exemption from election work for teachers appearing for CTET examination. ] : CTET परीक्षेत परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्तता करणेबाबत , महत्वपूर्ण निवेदन पत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले आहे .

(राज्यामध्ये दिनांक 07 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे . तर याच दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पूर्वनियोजित आहे . )

यामुळे माननीय आमदार विक्रम वसंतराव काळे यांनी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या प्रति निवेदन पत्र सादर करण्यात आला आहे .सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की , राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहे , यानुसार दिनांक 07.02.2026 प्रत्यक्ष मतदान होणार आहे.

संबंध देशामध्ये दिनांक 07 व 08 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET ) आयोजित करण्यात आलेली आहे . लाखोंच्या संख्येने शिक्षक ही परीक्षा देणार आहेत , यातील बऱ्याच शिक्षकांना राज्यामध्ये निवडणुकीचे काम देण्यात आलेले आहे . त्यामुळे त्यांना सदरील परीक्षा देणे अडचणीचे ठरणार आहे , नव्हे तर परीक्षेला मुकावे लागणार आहे .

तरी केंद्रीय परीक्षा पात्रता परीक्षेत बसलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळणे बाबत , संबंधित जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ कळविण्यात यावे , ही विनंती करण्यात आलेली आहे .

Leave a Comment