शिक्षकांची वेतननिश्चिती संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.18.02.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding salary fixation of teachers issued on 18.02.2026 ] : शिक्षकांची वेतननिश्चिती संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.18.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय सेवेतील अथवा ज्याचे वेतन अनुदान शासन मार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत अदा केले जाते अशा नियमित निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्योवेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा तसेच शालेय शिक्षण विभागाच्या ..

अधिपत्याखालील 100 टक्के अनुदानित खाजगी शाळा ज्यांमध्ये प्राथ्मिक / उच्च प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यिमक शाळा तसेच तसेच अध्यापक विद्यालये / शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा या शाळांमधील कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील शिक्षण सेवक पदावर विहीत पद्धतीने नियुक्त होतो , यावेळी वेतन निश्चिती करणेस मान्यता प्रदान करण्यात येत आहेत .

याकरीता सदर कर्मचाऱ्यांची पुर्वीची नियुक्ती नियमित स्वरुपाची व वैध मार्गाने झालेली असावी , म्हणजेच त्या कर्मचाऱ्यांची पुर्वीची नियुक्ती त्या पदाकरीता विहीत करण्यात आलेल्या सेवाप्रवेश नियमांच्या तरतुदींची पुर्तता सक्षम नियुक्ती प्राधिकाऱ्यांमार्फत झालेली असावी असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच अशा कर्मचाऱ्यांनी पुर्वीच्या पदावरील सेवेचे स्थायित्व लाभ प्रमाणपत्र धारण कले असणे किंवा शासकीय सेवकास त्याने धारण केलेल्या पदावर स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरीता ज्या अटी / शर्ती पुर्तता करणे आवश्यक आहे , त्या सर्व अटी / शर्तींची पर्तता अशा कर्मचाऱ्यांनी पुर्वीच्या पदावर केलेली असणे आवश्यक राहील .

तसेच अशा कर्मचाऱ्यांने नविन पदाकरीता केलेला अर्ज संबंधित कार्यालयाच्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या / कार्यप्रमुखाच्या पुर्वपरवानगीने केलेला असावा असे नमुद करण्यात आले आहेत .

त्याचबरोबर पुर्वीच्या पदावर आहरित केलेल्या अंतिम वेतनाचा टप्पा अनुज्ञेय असलेल्या नविन वेतनश्रेणीत समाविष्ट नसल्यास नविन वेतनश्रेणीच्या किमान टप्यावर या उमेदवारांची वेतननिश्चिती करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच पुर्वीच्या पदावर आहरित केलेल्या अंतिम वेतनाचा टप्पा अनुज्ञेय असलेल्या नविन वेतनश्रेणीत समाविष्ट असल्यास नविन वेतनश्रेणीतील अशा टप्यावर या उमेदवारांची वेतनश्चिती करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच सद्यस्थितीत ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे , अशा उमेदवारांची वेतनश्चिती सदर निर्णयांमध्ये दर्शविण्यात आल्याप्रमाणे करण्यात यावी असे नमुद करण्यात आली आहे , तसेच शिक्षण सेवक पदावरील रुजु दिनांकापासून अशी वेतननिश्चिती अनुज्ञेय असणार नाही असे नमुद करण्यात आले आहेत .

या संदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click here

Leave a Comment