Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ CAS for those who have been regularized in contractual/temporary temporary service ] : डॉ.प्रमोद नाईक समितीने सादर केलेल्या अहवालास अनुसरुन शासन निर्णय दिनांक 03 जुन 2022 व अन्य विविध शासन निर्णय / परिपत्रकांमध्ये तंत्रशिक्षण संचालनायाच्या अधिपत्याखालील सरकारी …
अशासकीय अनुदानित पदवी / पदविका संस्थांमधील कंत्राटी / हंगामी / अस्थायी सेवेतुन नियमित झालेल्या अध्यापकांना Carrer Advancement Scheme अंतर्गत लाभ मंजूर करणेबाबत निर्णय घेण्यात येत आहे .
यानुसार कंत्राटी सेवेतून नियमित झालेल्या अधिव्याख्यात्यांना AICTE मार्फत दिलेल्या मुदतवाढीस अनुसरुन दिनांक 31.12.2023 पर्यंत उजळणी वर्ग पुर्ण करण्याच्या अटीच्या अधीन राहून पुर्वलक्षी प्रभावाने सीएएस चे लाभ प्रदान करण्यात येत आहेत .
यानुसार सन 2015-16 मधील विविध निर्णयानुसार कंत्राटी / हंगामी सेवा नियमित करण्यात आलेल्या अध्यापकांना उजळणी वर्ग पुर्ण करण्यासाठी दिनांक 31.12.2023 पर्यंत सवलत देण्यात येत आहे .
तसेच सदर मुदतीत ज्या कंत्राटी / हंगामी अधिव्याख्यात्यांनी प्रशिक्षण वर्ग पुर्ण केले असतील त्यांना सीएएस चे लाभ पुर्वलक्षी प्रभावाने देण्यात येतील असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच सदर सवलत ही केवळ सन 2015-16 मध्ये शासन सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याकरीता निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमुद असलेल्या कंत्राटी / हंगामी अधिव्याख्यात्यांनाच लागु राहील असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच सदर सवलतीनंतर उजळणी / प्रशिक्षण वर्ग पुर्ण करण्याऱ्या अधिव्याख्यात्यांना त्यांनी ज्या ..
दिनांकास प्रशिक्षण पुर्ण केले आहे , त्या दिनांकापासून सीएएस चे लाभ देण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहेत .तर शासन सेवेत दिनांक 05.03.2010 पुर्वी नियुक्त असलेल्या अधिव्याख्यात्यांना सीएएस अंतर्गत पीबी – 4 ही वेतनश्रेणी देण्याकरीता पी.एचडी ची अट लागु राहणार नाही असे नमुद करण्यात आले आहेत .
तसेच सन 2003-04 नंतर सेवेत आलेल्या कंत्राटी / हंगामी अधिव्याख्यात्यांना एई / एम.टेक पात्रता पुर्ण करण्याकरीता सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकानंतर 03 वर्षे इतक्या कालावधीत सदर शैक्षणिक पात्रता पुर्ण करण्याच्या अटीवर सीएएस चे लाभ पुर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे पाहु शकता ..
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना “या” प्रकरणी निवृत्तीनंतर देखिल मिळतो प्रवास भत्ता ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !
- Retirement Age : सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे बाबत काही महत्वपुर्ण घडामोडी !
- CTET परीक्षेतील गुणांमध्ये 5% सुट देणेबाबत परिपत्रक ; या घटकातील उमेदवारांना लागु !
- कंत्राटी / हंगामी अस्थायी सेवेतुन नियमित झालेल्यांना Carrer Advancement Scheme अंतर्गत लाभ देणेबाबत GR दि.18.02.2026
- राज्यातील शाळांसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता सुधारित आकृतीबंध लागु करणेबाबत GR निर्गमित दि.18.02.2026