Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Government Corrigendum issued on 11.09.2025 through the Finance Department regarding State Officers/Employees and Retired Officers. ] : राज्य अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 11.09.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन शुद्धीपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2025-26 करीता कार्यरत त्याचबरोबर निवृत्त अधिकारी / कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजनेच्या नुतनीकरण करीता वित्त विभाग मार्फत दिनांक 18.07.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयामध्ये विमाछत्र रक्कम 15 लाख रुपये ऐवजी 20 लाख असे नमुद करण्यात आलेली आहे . सदर शुद्धीपत्रकानुसार 20 लाख रुपये ऐवजी 15 लाख रुपये असे वाचण्याचे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
वय वर्षे 18-35 व 36-45 वय असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता विमा छत्र रक्कम मध्ये सदर बदल करण्यात आलेला आहे . विमा हप्ता रक्कम पुर्वीप्रमाणेच आहे , केवळ विमा छत्र रक्कम 20 लाख रुपये ऐवजी 15 लाख रुपये करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
सन विमा छत्र नुतनीकरण हे सन 2025-26 या वर्षाकरीता असणार आहे , तर सदर विमा छत्र योजना राज्यातील सरकारी अधिकारी / कर्मचारी व कार्यरत व निवृत्त आ.भारतीय सेवेतील अधिकारी यांच्यासाठी असणार आहे .

