Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR issued on 30.03.2026 regarding ensuring standard procedure for teacher recruitment in the states ] : मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची मानक कार्यपद्धती सुनिश्चित करणेबाबत शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 30.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमदु करण्यात आले आहेत कि , दिनांक 22.06.2017 ते आजतागायत राज्यातील खाजगी अनुदानित / अंशत : अनुदानित तसेच विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदावर पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या नियुक्त्यांचा अहवाल शासनांस उपलब्ध करुन देण्याच्या हेतुने प्रत्येक शिक्षण विभाग करीता समितीचे गठण करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे .
यानुसार दिनांक 22.06.2017 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेले शिक्षक , ज्यांचे वेतन शालार्थ प्रणालीतुन अदा केले जाते , अशा शिक्षकांची जिल्हानिहाय व शाळानिहाय माहिती त्या – त्या समित्यांना उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून शिक्षण संचालक यांची असणार आहे .
तसेच अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था , विनाअनुदानित वरुन अनुदानित कडे बदली , कनिष्ठ महाविद्यालयातील अर्धवेळ पदावरुन पुर्ण वेळ पदावर उन्नयन या मार्गांनी पवित्र पोर्टलशिवाय , नियुक्ती होवू शकते .
याकरीता विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले आहेत . सदर समित्यांचे गठण शासनास अहवाल सादर करणे या संपुर्ण प्रक्रिया करीता दिनांक 15.05.2026 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात येत आहे . या दिनांकास अथवा तत्पुर्वी असा अहवाल शासनांस सादर करण्याची जबाबदारी संबंधित समितीची असणार आहे .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !