दि.01.09.2029 पर्यंत या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य अन्यथा अन्य पदावर होणार समायोजन !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR regarding the mandatory teacher qualification examination for teachers appointed on compassionate grounds ] : अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यता बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.31.07.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दि.02.09.2024 रोजी अथवा त्यापुर्वी ज्या उमेदवारांच्या सेवेस 03 वर्षे पुर्ण झाली आहे , अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या सेवेस ज्या दिनांकास 03 वर्षे पुर्ण झाली असतील त्या दिनांकापासुन सेवा सातत्य ..

व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .तसेच दि.01 सप्टेंबर 2029 पर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे ही अर्हता धारण न केल्यास , त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात येवून अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्यांने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच दिनांक 02 सप्टेंबर 2024 नंतर ज्या उमेदवारांच्या सेवेस 03 वर्षे पुर्ण झालेली आहे , त्यांचा शिक्षण सेवक कालावधी कमाल मर्यादेत दि.01 सप्टेंबर 2029 पर्यंत वाढविण्यात यावा व त्यांना सेवासातत्य देण्यात येवू नये असे नमुद करण्यात आले आहेत .

दि.01.09.2029 पर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे ही अर्हता धारण न केल्यास त्यांची शिक्षण सेवक पदावरील सेवा समाप्त करण्यात येवून त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्यांने करण्याचे निर्देश आहेत .

Leave a Comment