Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important Circular Issued Regarding Senior and Selection Grade Training 2026 — Dated 16.04.2026 ] : वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.16.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 नोंदणी करीता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रशिक्षणे या टॅब वर क्लिक करुन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण वर क्लिक करुन प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , नोंदणी करीता दि.30.04.2026 पर्यंत एकुण 12 वर्षे अर्हताकारी सेवा पुर्ण होणे आवश्यक असेल . तसेच निवड श्रेणी प्रशिक्षण करीता दि.30.04.2026 पर्यंत एकुण 24 वर्षे अर्हताकारी सेवा पुर्ण होणे आवश्यक असेल .
तसेच काही शिक्षक , मुख्याध्यापक , हे दि.04.05.2026 ते दि.30.04.2027 या कालावधीत 12 / 24 वर्षे अर्हताकारी सेवा पुर्ण करीता आहेत , व ते सदर कालावधीत निवृत्त होणार आहेत , फक्त असे शिक्षक , मुख्याध्यापक निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नोदंणी करु शकणार आहेत .
प्रशिक्षण नोंदणी दि.20.04.2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासुन दि.29.04.2026 रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे . याकरीता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही .


- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026