Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ recruitment Shasan Nirnay] : पदभरती संदर्भात राज्य शासनाचा मोठा महत्वपूर्ण शासन निर्णय ( GR) दिनांक 8 मे 2026 रोजी सहकार व पणन विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे की , राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने बँकांनी खालील कार्यपद्धती अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यामध्ये संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
त्याचबरोबर उर्वरित 30 टक्के जागा जिल्हा बाहेरील उमेदवारासाठी खुल्या असतील , तसेच जिल्हा बाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा स्थानिक उमेदवारांमधूनच भरता येईल असे निर्देश देण्यात आले आहेत .
सदरच्या शासन निर्णय ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पदभरतीचे जाहिरात या शासन निर्णयाच्या दिनांक पूर्वी प्रसिद्ध केली आहे , त्या बँकांना देखील सदर शासन निर्णय लागू राहील असे स्पष्ट करण्यात आले आहेत .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026