सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणे संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.12.05.2026

Spread the love

Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ Important government decision issued regarding sanction of retirement gratuity ] : सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यासंदर्भात कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मार्फत दिनांक 12 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की , दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाच्या अधिपत्याखालील राज्यातील व्यवसाय शिक्षणाच्या पूर्व व्यवसाय अधिक दोन स्तरावरील द्विलक्षी व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या अनुदानित तंत्रशाळा , प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील अनुदानित पदावरील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशतः निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे ..

01. यामध्ये शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान देय राहील..

02. त्याच बरोबर रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे .

दिनांक 1 नोव्हेंबर 2005 ते सदर शासन निर्णयाच्या दिनांक पर्यंत मृत्यू पावलेल्या शिक्षक /  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान , कुटुंब निवृत्ती वेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबत नमुना क्रमांक 03 मधील विकल्प कार्यालयास सादर करावा लागणार आहे .

त्यानुसार कुटुंब निवृत्तीवेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज / लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ लागू होणार आहे .

Leave a Comment