Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued regarding significant improvements to Casual Leave and Compensatory Leave. ] : किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा करणे संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.15.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अधिकारी / कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थिती व रजेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत , तथापि असे निदर्शनास आले आहे कि , काही अधिकारी / कर्मचारी हे 8 पेक्षा अधिक नैमित्तिक रजा उपभोगत असून , गट ब ( राजपत्रित ) ..
संवर्गातील काही अधिकारी बदली रजा मंजूर करण्याची मागणी करीत आहेत , यास्तव , नैमित्तिक रजा व बदली रजेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
अधिकारी / कर्मचारी यांनी एका कॅलेंडर वर्षात 8 पेक्षा अधिक नैमित्तिक रजा उपभोगल्यानंतर पुढील प्रत्येक एक दिवसाच्या अनुपस्थितीसाठी त्यांचे मागणीनुसार अर्जित रजा ( अर्जित रजा खाती शिल्लक असल्यास ) मंजूर करण्यात येईल .
तसेच गट ड व गट ब ( अराजपत्रित ) संवर्गातील कर्मचारी वगळता इतर सर्व अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना बदली रजा अनुज्ञेय होणार नाही , असे नमुद करण्यात आले आहेत .

- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026
- वाहतुक भत्ता ( TA ) शहरी व ग्रामीण भाग करीता सरसकट देणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित !
- शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय ..