Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution dated 16.06.2026 regarding the delegation of authority to disburse salary arrears of teaching and non-teaching staff. ] : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत दिव्यांग सक्षमीकरण विभाग मार्फत दि.16.06.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळा इ. मधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्यापुर्वी सदर थकबाकीची रक्कम देय आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी पुढीलप्रमाणे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत . वित्तीय अधिकार नियम ..
पुस्तिकानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी , मुंबई शहर / उपनगरयांना थकीत वेतन अदा करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत .
तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन थकीत वेतन निधी वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच मुंबई शहर / उपनगर करीता जिल्हाधिकारी यांनी लेखाधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन थकीत वेतन प्रस्तावास मंजूरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच यापुर्वी ज्या प्रकरणात थकबाकीची रक्कम अदा केलेली आहे , ती रक्कम नियम प्रमाणे अदा करण्यात आली आहे किंवा कसे , याबाबतची सविस्तर तपासणी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण , आयुक्तालय पुणे यांच्या विशेष तपासणी करुन त्याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनांस 90 दिवसांत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026
- वाहतुक भत्ता ( TA ) शहरी व ग्रामीण भाग करीता सरसकट देणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित !
- शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय ..