Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Diwali holiday declared for schools for 17 days from September 20 to October 6 ] : शाळांना दिवाळी सणापुर्वीच सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . ही सुट्टी तब्बल 17 दिवसांची आहे .
दिनांक 20 सप्टेंबर ते दिनांक 06 ऑक्टोंबर पर्यंत एकुण 17 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . ही सुट्टी दिवाळीची सुट्टी नसून , दसरा सणानिमित्त दीर्घ सुट्टी असणार आहे . यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टीचा मोठा आनंद घेता येणार आहे .
कोणत्या राज्याला सुट्टी असणार आहे ? : सदरची सुट्टी महाराष्ट्र राज्यातील शाळांना नसून , आपल्या शेजारील राज्य कर्नाटक राज्यांने ही सुट्टी जाहीर केली आहे . या सुट्टीमुळे दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये कपात करण्यात येणार आहेत .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांसाठी विशेष नैमित्तिक रजा प्रयोजन व सुट्टीचे दिवस !
दसरा हा सण दक्षिण भारतांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो , यामुळे शाळांना सुट्टी प्रयोजन करण्यात आले असल्याचे , प्रशासनांकडून सांगण्यात आले . याशिवाय आंध्र प्रदेश राज्याने दिनांक 24 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे .तर तेलंगणा राज्यात देखिल दिनांक 21 सप्टेंबर ते दि.03 ऑक्टोंबर पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
महाराष्ट्र राज्यात सुट्टी कधी ? : महाराष्ट्र राज्यात दसरा निमित्त दीर्घ सुट्टीचे प्रयोजन नसून , दिनांक 13 ऑक्टोंबर ते दिनांक 02 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सणानिमित्त दिर्घ सुट्टी असणार आहे .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026