घटस्थापना : दिनांक 22 सप्टेंबर वार सोमवार रोजी राज्यातील फक्त याच जिल्ह्यांना असणार सुट्टी ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Only these districts in the state will have a holiday on Monday, September 22 ] : दिनांक 22 सप्टेंबर 2025 , वार सोमवार रोजी राज्यातील सर्वच जिल्ह्यांना सुट्टी असणार नाही . फक्त ज्या जिल्हाधिकारी / विभागीय आयुक्तांना सुट्टी जाहीर केली आहे .त्याच जिल्ह्यांना सुट्टी असणार आहे .

सोमवारी कोणत्या सणानिमित्त सुट्टी ? : दिनांक 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवशी घटस्थापना हा सण आहे . हा सण भारतामध्ये मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत असतो .

सुट्टीच्या यादीमध्ये सुट्टी नमुद नाही : राज्य सरकारच्या वर्ष 2025 च्या सुट्टी यादीमध्ये घटस्थापनेची सुट्टी नाही . यामुळे ज्या जिल्हाधिकाऱ्यांना किंवा विभागीय आयुक्तांनी सु्ट्टी जाहीर केली आहे , फक्त त्याच जिल्ह्यांना सदर घटस्थापनेची सुट्टी मिळणार आहे .

कोणत्या जिल्ह्यांना असणार सुट्टी ? : यांमध्ये जळगाव , पुणे , सोलापुर , सांगली या चार जिल्ह्यांना सुट्टी जाहीर करणेबाबत संबंधित जिल्ह्याचे विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी कार्यालयांनी परिपत्रक काढले आहेत .

हे पण वाचा : उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1763 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

या जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस सुट्टी : वरील जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना दिनांक 20.09.2025 पासुन ते दिनांक 22.09.2025 पर्यंत सलग 03 दिवस सुट्टी मिळणार आहे . ( दि.20 सप्टेंबर शनिवार , 21 सप्टेंबर – रविवार , 22 सप्टेंबर – घटस्थापना )

Leave a Comment