Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Assistance to families affected by heavy rains and floods ] : अतिवृष्टी व पुर यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य मदत देण्यासाठी कार्यपद्धतीबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग मार्फत दिनांक 30.09.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
कोणते धान्य मिळणार ? : अतिवृष्टी व पुर यामुळे बाधित झालेल्यांना प्रति कुटुंब 10 किलो गहु , 10 किलो तांदुळे , 5 लिटर केरोसिन , 3 किलो तुर दाळ मोफत वितरण करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
सध्या पीठ तयार करणे जिकरीची असल्याने , कुटुंबाने मागणी केली असल्यास , त्यांना 10 किलो गहु ऐवजी 20 किलो तांदुळ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .तर तुर दाळ ही वितरीत करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी घाऊक बाजार मधील किंमतीस सुसंगत दराने तुर डाळीची खुल्या बाजारामधून खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
याकरीता जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी जिल्हा स्तरावरील महसुल विभाग मार्फत नैसर्गिक आपत्ती सुरु झाल्याची दिनांक / घोषणापत्र , अतिवृष्टी / पुर यामुळे बाधित झालेल्या कुटुंबाची संख्या व वितरीत करण्यात आलेली तूर दाळ तसेच तूर डाळ खरेदी करण्यासाठी आलेला एकुण खर्च याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देश आहेत .

- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !