Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Distribution of funds for October paid in November salaries ] : माहे ऑक्टोंबर महिन्यांचे वेतन अदा करणेबाबत , शालेय शिक्षण विभाग मार्फत निधींचे वितरण करणेकामी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभाग मार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्याकरीता मान्यता देण्यात येत आहे .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , माध्यमिक शिक्षण , अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य , अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान ..तसेच प्राथमिक शिक्षण , इतर स्थानिक संस्थांना प्राथमिक शिक्षणाच्या विस्तारासाठी अनुदान , खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान ..
तसेच अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान तसेच अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या उघडणे अशा लेखाशिर्ष अंतर्गत एकुण 26,80,000/- हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
लेखाशिर्ष निहाय निधीचे वितरण तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

सदर निधी वितरण बाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !