Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Rain alert issued for 20 districts of the state in the next 24 hours ] : पुढील 24 तासात राज्यातील 20 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . सविस्तर हवामान अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात .
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , आज दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे . यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे .
यांमध्ये प्रामुख्याने मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र , पश्चिम महाराष्ट्र , कोकण या विभागांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी : यांमध्ये राज्यातील मुंबई , रायगड , सिंधुदुर्ग , ठाणे , रत्नागिरी या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाची जोरदार शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
तसेच सांगली , सातारा , कोल्हापुर , पुणे , सोलापुर या जिल्ह्यांमध्ये देखिल हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . याशिवाय मराठवाड्यातील हिंगोली , परभणी , छ.संभाजीनगर , जालना , बीड , लातुर , नांदेड , धाराशिव , या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत वर्ग 03 व वर्ग 04 पदांसाठी पदभरती !
याशिवाय धुळे , नंदुरबार , जळगाव , अहिल्यानगर , नाशिक , भंडारा , गोंदिया , नागपुर , यवतमाळ , वर्धा , गडचिरोली , चंद्रपुर , अमरावती , बुलढाणा , वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025