Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Circular issued through Finance Department regarding increase in salary of employees by 15% of basic salary (maximum Rs. 1500/-) ] : कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनाच्या 15 टक्के ( कमाल 1500/- रुपये ) पर्यंत वाढ करणेबाबत , वित्त विभाग मार्फत दिनांक 17.10.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , आदिवासी तसेच नक्षलग्रस्त भागात चांगल्या होतकरु व कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणूकी करीता मार्गदर्शक तत्वे सा.प्र.विभागाच्या दिनांक 06.08.2002 नुसार निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयातील नमुद तरतुदीनुसार नक्षलग्रस्त / अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या आदिवासी विकास भागात मुख्यालयी असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या मुळ वेतनाच्या 15 टक्के इतका किमान 200/- व कमाल 1500/- रुपये दरमहा या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय राहील असे नमुद करण्यात आले आहेत .
या अनुषंगाने सदर प्रोत्साहन भत्ता पाचच्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावा अथवा सातवा वेतन आयोग प्रमाणे अदा करण्यात यावा याबाबत मार्गदर्शन मिळणेबाबत नागपुर विभाग व कोकण विभाग यांच्याकडून विनंती करण्यात आली होती .
या अनुषंगाने आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अदा करणेबाबत संचालनाच्या दिनांक 27.10.2020 रोजीच्या पत्रानुसार सुचना दिलेल्या आहेत , त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

दिनांक 27.10.2020 रोजीचे पत्र

- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !