Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Teachers’ protest stance against the decision to make TET mandatory ] : शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यतेच्या विरोधात शिक्षकांचा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाणार आहे .
सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 01.09.2025 रोजी दिलेल्या निकालानुसार , शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आले आहे . या अनिवार्यता करणेबाबत देशातील बऱ्याच राज्य सरकार मार्फत पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आले आहेत .
यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत स्पष्ट केले आहे कि , या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी एका मोठ्या बेंचचे गठण करुन सदर मुद्दा निकाली काढला जाईल . सर्वोच्च न्यायालयाच्या अस्पष्ट निकालामुळे आता शिक्षकांना पुढील 02 वर्षांमध्ये टीईटी उत्तीर्ण व्हावे लागणार आहे .
अनिवार्यता विरोधात शिक्षकांचे आंदोलनाचा पवित्रा : शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यतेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे . तसे निवेदन राज्याचे मा.देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे .
हे पण वाचा : युनायटेड कमर्शियल बँक अंतर्गत तब्बल 532 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
टीईटी अनिवार्यतेमुळे शिक्षकांच्या नोकरीवर साशंकता निर्माण झालेली आहे .यामुळे राज्य सरकारने यावर पुढाकार घेवून , शिक्षकांची बाजु सर्वोच्च न्यायालयांमध्ये मांडवी असे निवेदन देण्यात आले आहेत .
01 ते 08 वी पर्यंत शिकविणारे शिक्षक हे शिक्षणाचा कणा आहे , या शिवाय शिक्षक शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणात करत असतात . यामुळे शिक्षकांना विश्वासात घेवून , याबाबत सर्वोच्च न्यायालयांमध्ये बाजु मांडण्याचे निवेदन देण्यात आले आहेत .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
