GR : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित GR निर्गमित द‍ि.03.09.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Very important revised GR issued on 03.09.2025 for State Officers/Employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक 02.04.2022 व शुद्धीपत्रक दि.08.01.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार , राज्य शासन सेवेत वय वर्षे 40-50 वयोगट अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांना 02 वर्षातुन एक तर त्यापेक्षा अधिक वर्षे 51 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्यांना प्रति वर्षी वैद्यकीय तपासणी प्रतिपुर्ती करीता 5000/- रुपये अदा करण्यास मंजुरी आहे .

सदर चाचण्या ह्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध नसल्यान , खाजगी रुग्णालयांमध्ये , बाह्य यंत्रणेद्वारे चाचणी करण्यास मंजूरी आहे , यांमध्ये खाजगी रुग्णालयांची यादी वरील नमुद शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .

सदर निर्णयानुसार नमुद केले आहेत कि , राज्य शासन सेवेत वय वर्षे 40 ते 50 या वयोगटांमधील महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना 02 वर्षामधून एक वेळ तर वय वर्षे 51 व त्यापेक्षा अधिक वयोगट असणारे अधिकारी / कर्मचारी यांना ..

दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय असलेबाबत , त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी करीता रुपये 5000/- रुपये या प्रमाणे प्रतिपुर्ती अदा करणे करीता अपवादात्मक बाब म्हणून सा.प्र.विभागाच्या दिनांक 08.12.2022 रोजीच्या प्रपत्र अ येथे नमुद करण्यात आलेल्या चाचण्या ह्या बॉम्बे हॉस्पिटल , मुंबई या खाजगी रुग्णालय मार्फत उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहेत ..

Leave a Comment