सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयांमध्ये वाढ होणार नाही ? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Will the retirement age of government employees not be increased? Supreme Court decision. ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयांमध्ये वाढ करणेबाबत , सर्वोच्च न्यायालयाने महत्वपुर्ण निकाल दिला आहे .

देशांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे राज्यांनुसार भिन्न आहेत , तसेच केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयांमध्ये देखिल फरक आहे . केंद्र सरकारसह देशातील तब्बल 25 राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहे .

केंद्र व देशातील 25 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यासह उर्वरित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीवय 60 वर्षे करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासुन सुरु आहे .

यावर सवोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार , सेवानिवृत्तीचे वयामध्ये वाढ करणेबाबत राज्य व केंद्र सरकार नियमावली तयार करतील . सेवानिवृत्तीचे वय हे बदलत्या काळानुसार बदलणे अपेक्षित आहे .

सेवानिवृत्तीचे वय हे तत्कालिन काळानुसार ठरविण्यात आलेली आहे . सध्याची स्थिती मध्ये देखिल राहणीमानाचा दर्जा जरी उंचावला असला , तरी अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य 50 वर्षाच्या नंतर साथ देत नाहीत .

यामुळे निवृत्तीचे वय हे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असावी असे स्पष्ट करण्यात आले आहेत . कारण आरोग्य चांगले नसल्यास त्याच्या काम करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो .

अनुभव पेक्षा कार्यक्षमता अधिक महत्वपुर्ण आहे , न्यायालयाच्या सदर निर्णयामुळे निवृत्तीच्या वय वाढ बाबत , सरकार जे धोरण ठरवतील ते योग्‍य असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे . कारण निवृत्तीचे वय वाढविणे हा एक प्रकारचा वैधानिक विषय आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .

Leave a Comment