Mh-tv@24 प्रणिता पवार प्रतिनिधी [ Major announcements regarding the 8th Pay Commission ] : आठवा वेतन आयोग संदर्भातील आत्ताच्या मोठ्या प्रमुख घोषणा तसेच डी.ए वाढ , फिटमेंट फॅक्टर मध्ये बदल व इतर भत्ते मधील संशोधन बाबत संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे जाणुन घेवूयात .
नविन वेतन आयोग बाबत प्रमुख घोषणा : केंद्र सरकारने नविन वेतन आयोगाचे Terms of Reference ( ToR ) ला मंजूरी देण्यात आली आहे . तसेच सातवा वेतन आयोगातील मुळ वेतनश्रेणीमध्ये बदल करण्यास परवानगी देण्यात आली आहे .
नविन वेतन आयोगाची रचना ही पुढील 18 महिने म्हणजे माहे मे 2027 पर्यंत पुर्ण करण्यात येतील . सदर 18 महिन्यांच्या काळात सातवा वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढ देण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महागाई भत्ता मधील बदल : माहे जुलै 2025 पासुन केंद्रीय कर्मचाऱ्यांना 58 टक्के दराने डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे . आठवा वेतन आयोग प्रत्यक्ष लागु होईपर्यंत अंदाजे 3 टक्के डी.ए वाढ ग्रहित धरल्यास अनुक्रमे माहे जानेवारी 2026 ला 61 टक्के डी.ए होईल .
तसेच माहे जुलै 2026 ला 64 टक्के होईल व माहे जानेवारी 2027 ला 67 टक्के पर्यंत डी.ए वाढ होईल . सदर डी.ए वाढ ही सातवा वेतन आयोग प्रमाणेच दिली जाईल .
फिटमेंट फॅक्टर मध्ये बदल : फिटमेंट फॅक्टर मध्ये किमान 1.58 पट तर कमाल 1.98 पट पर्यंत वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत .
इतर भत्ताचा समावेश : आठवा वेतन आयोगांमध्ये इतर भत्तांचा समावेश करण्यास संशोधन करण्यात येणार आहे . जसे कि वाहन भत्ता , वैद्यकीय भत्ता / FMA / TA , जोखीम भत्ता , ड्रेस भत्ता , Skill Based Allowance etc.
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026
