विशेष महागाई भत्ता मध्ये वाढीसह किमान वेतनात वाढ ; परिपत्रक निर्गमित !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Increase in minimum wage along with increase in special dearness allowance ] : विशेष महागाई भत्ता मध्ये वाढीसह किमान वेतनात वाढ बाबत राज्य शासनांकडुन महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत .

दि.01.01.2026 ते दि.30.06.2026 या कालावधीकरीता सुधारित विशेष महागाई भत्ता व किमान वेतन जाहीर करण्यात आलेली आहे .सदर वाढ ही पदांनुसार करण्यात आलेली आहे . पदनिहाय किमान वेतन व विशेष डी.ए जाहीर करण्यात आलेला आहे .

सदर डी.ए चा लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार ? : सदर किमान वेतन व विशेष महागाई भत्ता वाढ ही कारखाना अधिनियम 1948 अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या उद्योग , कारखाने , आस्थापने , दुकाने इ. मध्ये कार्यरत कामगारांना सदर डी.ए व किमान वेतन वाढ लागु करण्यात आलेली आहे .

यांमध्ये किमान वेतन 16620/- रुपये तर विशेष महागाई भत्ताचे दर 3,135/- रुपये पर्यंत वाढविण्यात आलेले आहेत .सदरचे दर हे कुशल , अकुशल कामगारांनुसार भिन्न आहेत .

सदरचा वाढीव वेतनाचा लाभ हा राज्यातील 67 अनुसुचित उद्योग क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांना लाभ मिळणार आहे . सदर वेतन वाढीची बऱ्याच दिवसांपासुन मागणी होत होती , अखेर कामगारांची ही मागणी मान्य झाली आहे .

या संदर्भातील सविस्तर वाढीव किमान वेतन व विशेष महागाई भत्ताचे दर पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment