पेन्शन , वाढीव महागाई भत्ता व रिक्त पदांवर पदभरती इ. विविध प्रलंबित मागणींवर 17 लाख राज्य कर्मचारी संपावर जाणार !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [17 lakh state employees will go on strike over various pending demands like pension, increased dearness allowance and filling vacant posts. ] : निवृत्तीवेतन योजना , वाढीव महागाई भत्ता वाढ , तसेच रिक्त पदांवरील पदभरती अशा विविध प्रलंबित मागणीसाठी राज्य कर्मचारी संपावर जाणार आहेत .

राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी विविध प्रलंबित असणाऱ्या मागण्या पुर्ण होत नसल्याने , लवकरच संपावर जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर व मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी दिली आहे .

प्रमुख मागण्या : 01) महागाई भत्ता वाढ – केंद्र सरकारप्रमाणे दि.01.07.2025 पासुन वाढीव महागाई भत्ता राज्यातील कर्मचाऱ्यांना लागु करणेबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्याची मागणी आहे .

02.सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना : सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना संदर्भात विविध अटी / शर्ती स्पष्टीकरण संदर्भातील सविस्तर नियमावली / शासन निर्णय निर्गमित करण्याता यावा .

03.रिक्त पदांवर पदभरती : राज्यातील सर्वच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत . अशा रिक्त पदांवर तात्काळ पदभरती करण्याची मागणी केली जात आहे .

वरील प्रमुख मागणींवर लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास , राज्यातील तब्बल 17 लाख राज्य कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत .

Leave a Comment