Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding general transfer of state employees for the year 2026 issued on 06.02.2026 ] : राज्य कर्मचाऱ्यांचे बदली संदर्भात होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 अधिसुचित करण्यात आलेला आहे . या नियमानुसार ..
राज्यातील सर्वच विभागातील 06 वर्षे पुर्ण झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदली करण्याबाबतची कार्यवाही माह एप्रिल – मे मध्ये करण्यात येणार आहे . मागील विचार केला असता , बऱ्याच वर्षांपासुन असे निदर्शनास येते कि , अधिकारी / कर्मचाऱ्यांची बदली केल्याच्या नंतर त्यांच्या बदलीकरीता मुदतवाढ देणची मागणी…
अथवा बदली रद्द करण्याची मागणी संबंधित प्रशासकीय विभाग करत असतात .या कारणांमुळे बदली झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना बदली झालेल्या विभागाने रुजु होण्याकरीता कार्यमुक्त न केल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण होत असतात .
बदली नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे . यामुळे सन 2026 या वर्षातील सार्वत्रिक बदल्यांमध्ये ज्या विभाग मधील अधिकारी / कर्मचारी बदलीस पात्र असतील , त्यांची यादी करुन त्यांच्या जागी पर्यायी अधिकारी / कर्मचारी यांची व्यवस्था करणेबाबतची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
ज्यामुळे बदली झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याच्यानंतर सदर विभागातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास सहकार्य होईल .

- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !