TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Court withdraws order regarding TET ] : शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात न्यायालयाने दिलेला आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे . यामुळे शिक्षकांना मिळालेला दिलासा अखेर दुरावला आहे .सविस्तर आदेश पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

दि.20.02.2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात दिलेला निकालास छ.संभाजीनगर खंडपीठाने दिनांक 23.02.2026 रोजी आदेश मागे घेतला आहे . यामुळे फक्त 02 दिवसांमध्येच आदेश मागे घेतल्याने शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे .

दि.20.02.2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल : मा.सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सन 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे . असे असताना , सध्यस्थितीत प्रतिवादी / जिल्हा परिषदा मार्फत पदोन्नती देत असताना , शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यता करण्यात आलेली आहे .

यामुळे सन 2027 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटी जे शिक्षक पदोन्नती करीता पात्र आहेत , त्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दि.20.02.2026 रोजी दिलेला होता .

परंतु सदर आदेश दि.23.02.2026 रोजी छ.संभाजीनगर खंडपीठाने पुन्हा रेकॉर्डवर ठेवण्यात आलेला होता . यावेळी खंडपीठाने यापुर्वीचे नागपुर खंडपीठ व मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश मागे घेण्यात आले .

व पदोन्नती करीता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य असल्याचा आदेश जारी करण्यात आले आहेत .यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे .

Leave a Comment