पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोगांमध्ये किमान पेन्शन मध्ये मोठी वृद्धी ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Significant Increase in Minimum Pension for Pensioners under the 8th Pay Commission ] : पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे . कारण एकुण पेन्शन मध्ये मोठी वृद्धी होणार आहे .

प्राप्त माहितीनुसार , केंद्र सरकारमार्फत किमान पेन्शन मध्ये वाढ केली जाणार आहे . ही वाढ 16,740/- रुपये इतकी होणार आहे . सदरची वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर आधारित असणार आहे .

पेन्शन मध्ये किती वाढ होणार ? : केंद्र सरकार पेन्शन धारकांच्या किमान पेन्शन मध्ये मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे , सध्या पेन्शन धारकांना किमान 9000/- इतकी पेन्शन मिळते , यांमध्ये 16,740/- रुपये इतकी वाढ केली जाणार आहे .

यामुळे किमान पेन्शन वाढून 25,740/- रुपये इतकी होण्याची शक्यता आहे . सदर वाढ ही फिटमेंट फॅक्टरवर आधारित असणार आहे . यांमध्ये महागाई भत्ताचा देखिल अंतर्भाव असणार आहे , यामुळे पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे .

नविन निवृत्तीवेतन योजनांमध्ये देखिल बदलाची प्रस्ताव : नुकतेच केंद्र सरकारने सुरु केलेली युपीएस पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना पुर्ण पेन्शनचा लाभ मिळविण्यासाठी किमान 25 वर्षे सेवा पुर्ण आवश्यक असेल , तर निवृत्तीपुर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांतील त्यांच्या मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम इतकी पेन्शन म्हणून निश्चित केली जाईल .

Leave a Comment