Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Letter regarding the early declaration of holidays for schools due to the war-like situation. ] : सध्या इराण -इस्त्राईल युद्धाचे जगावरच विपरित परिणाम दिसुन येत आहेत . यांमध्ये भारत देशांवर सध्या इंधन संकट उद्भवले आहे .
याकरीता राज्यातील शाळांना लवकरच सुट्टी देण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत आमदार ज.मो.अभ्यंकर सदस्य महाराष्ट्र विधान परिषद यांनी मा.श्री.सचिन्द्र प्रताप सिंग , भा.प्र.से आयुक्त शिक्षण आयुक्तालय , यांच्या प्रति निवेदन पत्र सादर केले आहेत .
सदर निवेदन पत्रांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , इराण -इस्त्राईल – अमेरिका युद्धाचे परिणाम संपुर्ण जगाला भोगण्याचा प्रसंग निर्माण झाला आहे . सद्या देशांमध्ये डिझेल, पेट्रोल व गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे . युद्ध मिटण्याचे चिन्ह देखिल दिसत नाहीत .
व भारताला गरजे इतके इंधन पर्यायी व्यवस्थेने उपलब्ध होण्याचे संकेत कुठूनही मिळत नाहीत . अशा स्थितीमध्ये 15 दिवसानंतर वाहनांना इंधन व घरात गॅसचा पुरवठा होण्याची निश्चितता अंधुक आहे , म्हणजेच वाहतुकीचे मार्ग एकतर मर्यादीत होतील , अथवा बंद होतील , यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना शाळांमध्ये पोहचणे अडचणीचे ठरेल अथवा काही ठिकाणी ते अशक्यच होईल .
यामुळे 15 दिवसानंतरची परिस्थितीचे आकलन गांभीर्याने करुन शैक्षणिक वर्षाचा समारोप लवकरात लवकर करण्याची निकड निर्माण झाली आहे .यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अथवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा संपवून मूल्यांकन कार्य शिक्षकांना घरी अथवा सोयीनुसार शाळेत करणेची मुभा होती ..
याकरीता 10 एप्रिल पुर्वी परीक्षा संपवून मुल्यांकन , पडताळणी व निकालपत्राचे कार्य शिक्षकांना घरी अथवा शाळेत त्यांच्या सोईने पुर्ण करण्याची सवलत देण्याची सवलत देण्याचे निवेदन करण्यात आले आहेत .

- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !