दि.01.04.2026 रोजी राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 06 major important cabinet decisions were taken in the state cabinet meeting on 01.04.2026. ] : दिनांक 01.04.2026 रोजी राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 06 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत .

01.उपसा सिंचन करीता अनुदान तरतुद : साकळाई जिल्हा अहिल्यानगर येथे उपसा सिंचन करीता रुपये 1,234 कोटी इतकी तरतुद करण्यास मान्यता देण्यात आली . यामुळे तब्बल 9600 हेक्टर इतके क्षेत्र सिंचन क्षेत्राखाली येणार आहे .

02.नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण : राज्यांमध्ये नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यात आली आहे . यानुसार राज्यात 54 नद्या ह्या प्रदुषित पट्यातुन पुनरुज्जीवन करण्यात येणार आहेत .

03.क्रीडा संकुल : नवसारी जिल्हा अमरावती येथील क्रिडा संकुल करीता 16708 चौ.मी जागा वर्ग उपलब्ध करुन देण्यास मान्यता .

04.अनुसुचित जाती : एसटी आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात प्राप्त झालेल्या अर्ज , निवेदन अनुषंगाने मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण करण्यात आले आहेत .

05.भुकरमापक : भुमि अभिलेख विभाग मध्ये भुकरमापक या पदाऐवजी परिरक्षण भुमापक हे पद निर्माण करण्यात येत आहे , तर हे पद पदोन्नती व विभागीय भरती करीता उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत .

06.शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ  : इ.आठवी ते बारावी दिव्यांग विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती रक्कमेत वाढ करण्यत आली आहे .

Leave a Comment