Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ On April 21, 2026, seven major and significant Government Resolutions were issued regarding State officers and employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.21.04.2026 रोजी 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.जलसंपदा विभाग : अधिक्षक अभियंता व प्रशासक , लाभक्षेत्र विकास प्राधिकरण बीड व त्यांच्या अधिनस्त विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरीत नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.03.2026 ते दि.31.08.2026 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
02.ग्राम विकास विभाग : महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी /प्रकल्प संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.सार्वजनिक आरोग्य विभाग : आदिवासी उपाय योजना क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीसाठी स्थापन केलेल्या 37 वैद्यकी पथकातील 147 अस्थायी पदे पुढे चालु ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.अल्पसंख्याक विकास विभाग : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग , मुंबई या कार्यालयासाठी अनुदानाच्या संवितरण / विनियोगाकरीता नियंत्रक अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
05.सामान्य प्रशासन विभाग : मंत्रालयीन विभागातील लिपिक – टंकलेखकांकरीता सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा सन 2026 अर्ज मागविणेबाबत जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे .
06.सामान्य प्रशासन विभाग : निवडश्रेणी लघुलेखक पदावरुन वरिष्ठ स्वीय सहायक पदावर पदोन्नती देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
07.कृषी व पदुम विभाग : महाराष्ट्र कृषी सेवा गट अ ( कृषी उपसंचालक ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यास मंजूरी देण्यात आली आहे .
वरील सर्व 07 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026