Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Circular regarding digital service registration (records) in Shalarth system dated 09.04.2026 ] : शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्डस करणेबाबत श्री.पवन जोशी बिझनेस ॲनालिस्ट यांच्या प्रती दि.09.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन , वैद्यकीय बील माहे 15 फेब्रुवारी 2026 पासुन ..
खाजगी अनुदानित शाळांमधील अदा करता येणार नसल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे . तसेच ज्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे शालर्थ प्रणालीवरील कागदपत्रे हे डीडीओ – 2 / शिक्षणाधिकारी / विभागीय शिक्षण उपसंचालक / सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध / अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असणार आहे .
तसेच डिडीओ – 2 स्तरावरील लॉगीन मधून डिजिटल सेवा रेकॉर्डस या प्रणाली अंतर्गत अपलोड नाहीत .. अशा सुचना संचालनायाचे दि.22.01.2026 नुसार देण्यात आल्या होत्या ..
दिनांक 08.04.2026 रोजीच्या मा.आयुक्त यांच समवेत झालेल्या बैठकीतील निर्देशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता अथवा शालाथ आयडी मान्यता आदेश तपासणी अधिक्षक ते विभागीय अध्यक्ष या स्तरावर अमान्य केलेले आहेत , तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे डीडीओ – 01 स्तरावर काम अद्याप पुर्ण झाले नाहीत अशा कर्मचाऱ्यांची वेतन व भत्ते अदा करता येणार नल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत .

- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !