Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ new nps feature] : राज्य सरकारने दिनांक सहा मे 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे . सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचे मुख्य वैशिष्ट्य खालील प्रमाणे पाहूयात .
सदर योजना ही दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्याची निर्देश आहेत . याकरिता विकल्प सादर करण्याची अंतिम मुदत ही दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत असणार आहे .सदरची योजना सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहे .
पूर्ण निवृत्ती वेतन : वीस वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन व त्यावर विद्यमान महागाई भत्ता वाढ मिळणार आहे .
दहा ते वीस वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना अशी मिळणार निवृत्तीवेतन : तर ज्यांची सेवा ही 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान असेल त्यांना त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन मिळणार आहे . यामध्ये दहा वर्षाच्या सेवेनंतर किमान निवृत्तीवेतन 7500 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे .
कुटुंब निवृत्ती वेतन : निवृत्ती वेतनाच्या 60 टक्के इतकी रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून देय ठरणार आहे .
NPS मधील रक्कम : राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) मधील जमा रक्कम पैकी साठ टक्के रक्कम शासनाकडे चलनाने जमा करावी लागणार आहे . तर उर्वरित 40 टक्के निधी मधून मिळणाऱ्या वार्षिक तपशील सादर करावा लागणार आहे .
जर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी राष्ट्रीय पेन्शन योजना मधून काही रक्कम काढली असेल तर दहा टक्के व्याजासह परत करावी लागणार आहे अन्यथा निवृत्तीवेतन त्याच प्रमाणात कमी केले जाईल .
ज्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे त्यांना या सुधारित योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना NPS योजनाच लागू राहील .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.02.06.2026 रोजी घेण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण GR..
- दिनांक 2 जून 2026 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 04 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- राज्यातील सर्वच सरकारी / निमसरकारी (ZP) कर्मचारी , पेन्शन धारकांना 60% दराने DA वाढ कधी ?
- आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचारी , पेन्शनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली संदर्भात मोठा कॅबिनेट निर्णय दि.26.05.2026