दिनांक 08 मे रोजी राज्य अधिकारी /कर्मचारी संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्त्वपूर्ण GR

Spread the love

Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ state employee imp gr dated 08 may ] : राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात दिनांक 08 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण 04 मोठे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01. सार्वजनिक आरोग्य विभाग : आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ ( S 20) मधील अधिकाऱ्यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करणे संदर्भात निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

02. महिला व बालविकास विभाग : सन 2026- 27 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन आदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आले आहे .

03. कृषी व पदुम विभाग : जागतिक कृषी गणना योजना महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पिकांचे क्षेत्रफळ वेळेवर कळवण्याची योजना व पिकांच्या आकडेवारीत सुधारणा करण्याची योजना या योजना अंतर्गत मंजूर पदावर कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे माहे मार्च 2026 ते ऑगस्ट 2026 या सहा महिन्यांचे वेतन अदा करण्याकरिता निधीचे वितरण करण्यात आले आहेत .

04. मानधन व प्रोत्साहन भत्ता : अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

या संदर्भातील वरील 04 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता Click here

Leave a Comment