Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ varisth vetanshreni prashikshan update] : जनगणना कामकाजामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे . या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 12 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .
सदर परिपत्रकानुसार दिनांक 20 एप्रिल 2026 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण पात्र शिक्षकांची नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती . परंतु सदर नाव नोंदणी प्रक्रियास दिनांक 12 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती .
दरवर्षी सदरील प्रशिक्षणाचे नियोजन माहीत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येते , मात्र भारताची जनगणना 2027 चा पहिला टप्पा दिनांक 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीमध्ये नियोजित आहे .
या राष्ट्रीय कार्यासाठी बहुतांश शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे . त्यामुळे सदरील प्रशिक्षण माहे नोव्हेंबर 2026 मध्ये दीपावलीच्या सुट्टीत आयोजित करण्याबाबत नियोजन सुरू आहे .
माहे जून 2026 ते माहे ऑक्टोबर 2026 या कालावधीत सेवेची 12 / 24 वर्ष पूर्ण होऊन सेवानिवृत्ती होणाऱ्या व पोर्टलवर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण माहे नोव्हेंबर 2026 पूर्वी आयोजित करण्याबाबत पडताळणी सुरू आहे . याची नोंद घेण्याची निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आली आहे .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026