दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Four major, significant Government Resolutions (GRs) issued on June 10, 2026, regarding state officers and employees. ] : दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.कृषी व पदुम विभाग : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या आस्थापनेवरील गट अ व गट ब संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे .

02.गृह विभाग : पोलिस महासंचालक यांचे उपसहायक गट अ या पदावरुन पोलिस महासंचालक यांचे वरिष्ठ उपसहायक महासंचालक यांचे वरिष्ठ उपसहायक गट अ या संवर्गातील पदावर पदोन्नती देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

03.सामान्य प्रशासन विभाग : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने दिव्यांग आरक्षणानुसार , निवडश्रेणी लघुलेखक पदावर पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश ज्येष्ठतासुचीमध्ये करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

04.आदिवासी विकास विभाग : राज्यातील आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये श्रेणीवाढ करुन त्या ठिकाणी अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावी नंतर 02 वर्षे कालावधी करीता नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या साह्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

वरील चारही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment