Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ The court has set aside the Directorate of Education’s orders; schools will now open from June 30. ] : शिक्षण संचालनालय मार्फत दि.09.06.2026 रोजी शाळा सुरु करणेबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते .
सदर वेळापत्रकानुसार विदर्भातील शाळा ह्या 22 जुन पासुन सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले होते , तर राज्यातील इतर सर्व शाळा 15 जुन पासुन सुरु करण्याचे निर्देश होते .परंतु याबाबत कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती .
सदर याचिकेवर दिनांक 10.06.2026 रोजी नागपुर खंडपीठाने निर्णय दिला आहे .सदर निकालांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , या बाबत शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 20.04.2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
दि.20.04.2023 रोजीच्या निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळा दरवर्षी दि.15 जुन व त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरु होती व विदर्भ विभागातील शाळा दरवर्षी दि.30 जुन रोजी व त्या दिवशी सुटी आल्या त्याच्या पुढील दिवशी सुरु होतील .असे निर्देश आहेत .
यानुसार आता विदर्भातील शाळा ह्या 30 जुन पासुन तर राज्यातील इतर विभागातील शाळा ह्या 15 जुन सुरु होणार आहेत .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026