Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Bus Corporation’s unusual plan for Navratri festival ] : बस महामंडळाची नवरात्रोत्सव निमित्त भन्नाट योजना काढली आहे . या योजनाच्या माध्यमातुन साडेतीन शक्तीपीठाचे माफक दरांमध्ये दर्शन होणार आहे .
सदर योजनाची सुरुवात ही दिनांक 27 सप्टेंबर 2025 पासुन सुरु होणार आहे . याकरीता पुणे विभाग मार्फत विशेष बस सेवा सुरु करण्यात येणार सून , स्वारगेट , शिवाजीनगर आगारातुन सकाळी 7 वाजता बस सुरु होणार आहे .
प्रवासाचा मार्ग : प्रथम कोल्हापुर महालक्ष्मीचे दर्शन त्यानंतर तुळजापुर – तुळजाभवनीचे दर्शन त्यानंतर माहुर – रेणुकादेवीचे दर्शन व त्यानंतर नाशिक सप्तशृंगीचे दर्शन करुन परतीचा प्रवास होईल .
प्रवासाचे भाडे : सदर योजनांच्या माध्यमातुन पुरुषांना प्रवासी भाडे हे 3101 तर महिला प्रवाशांसाठी 1549/- रुपये असे भाडे ठेवण्यात आले आहेत . प्रवास भाड्यांमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सुट दिलेली आहे .
बुकींग कसे करावे ? : ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी msrtc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा ऑफलाईन पद्धतीने विभागीय कार्यालयांशी भेट देवून बुकींग करु शकता .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !