Pay Commisson : 01 जानेवारी 2026 पासुन आठवा वेतन लागु ; पे – स्केल 01 ते 07 पर्यंत होणार वेतनात मोठी वाढ !

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission new update ] : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे दिनांक 01.01.2026 पासुन सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .

पे स्केल 01 ते 07 पर्यंतच्या वेतनात होणार वाढ : एका सर्वेक्षण अंती जास्त कष्ट करणाऱ्या पदांना कमी वेतन मिळत आहेत . जसे कि , शिपाई हे पद पे – स्केल 01 मध्ये येते , त्याच्या कामाचे स्वरुप पाहीले असता , त्याचे काम अधिक असुन , कामाचा वेळ देखिल इतरांपेक्षा अधिक आहे .

याशिवाय लिपिक वर्गीय कर्मचारी , गृह विभागातील पोलिस शिपाई इ. पदांना अधिक काम करावे लागते , परंतु त्या तुलनेत त्यांचे वेतन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे . यामुळे पे – स्केल 01 ते 07 पर्यंत वेतनश्रेणीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवितण्यात येत आहेत .

वर्गवारीनुसार वेतनश्रेणी : सध्या सरकारच्या विविध विभागांमध्ये समान पद , समान काम असतांना देखिल वेतनश्रेणीमध्ये बदल आहे , तर सदर वेतनश्रेणीमधील तफावत दुर करुन सर्वांना समान वेतनश्रेणी लागु केली जाणार आहे .

हे पण वाचा : घरभाडे भत्ता वाहन भत्ता , प्रोत्साहन भत्ता इ.देय भत्ते बाजार किमतीवर आधारित मिळणार .

वेतनश्रेणीची वर्गवारी : कामाचे स्वरुप , पदोन्नतीच्या संधी इ. बाबी विचारात घेवून वेतनश्रेणीची वर्गवारी करण्यात येणार आहे .

कामाच्या स्वरुपावर पदोन्नती : नविन वेतन आयोगांमध्ये कामाच्या स्वरुपावरुन अधिकारी / कर्मचाऱ्यांना गुणांकन दिले जाणार असुन , त्या आधारे पदोन्नतीची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत .

पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये वृद्धी : पेन्शन धारकांना देखिल नविन वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन संरचना लागु करण्यात येणार आहे . सदर लाभ हा दिनांक 01.01.2026 पासुनच लागु केला जाणार आहे .

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ( कर्मचारी विषयक )  शासन निर्णय PDF स्वरूपात पुस्तिका फक्त 110/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी Click Here

Leave a Comment