राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे ऑक्टोंबरच्या वेतनातुन 01 दिवसांचे वेतन कपात ; GR निर्गमित दि.08.10.2025

Spread the love

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 01 day salary deduction from October salary of all employees in the state ] : माहे ऑक्टोंबरच्या वेतनातुन 01 दिवसांचे वेतन कपात करणेबाबत , दिनांक 08.10.2025 रोजी सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 08.10.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत ‍कि , अतिवृष्टीमुळे आपतीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरीता राज्य सरकारकडून देखिल मदत कार्य सुरु असून , सदर नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी सहाय्य व मदत व पुनर्वसन कामाकरीता हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्व भारतीय प्रशासन सेवा / पोलिस सेवा / वन सेवा व राज्य सरकारचे सर्व अधिकारी / कर्मचारी यांचा ..

सहभाग असावा या करीता माहे ऑक्टोंबर 2025 च्या वेतनातील प्रत्येकी 01 दिवसांचे वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणेबाबत आवाहन करण्यात येत आहेत .तसेच राज्यातील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अखिपत्याखालील सर्व सरकारी / निमसरकारी कार्यालये ..

जिल्हा परिषद , पंचायत समिती , महानगरपालिका , नगरपालिका / नगरपरिषद , सार्वजनिक उपक्रमे , महामंडळे तसेच सर्व स्वायत्त संस्था विभगा प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी सदर परिपत्रक विभागातील / कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देण्याचे व त्यांना याबाबत समजावून सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच सदर एक दिवसाचे कपात करीता अधिकारी / कर्मचाऱ्यांचे अनुमतीपत्र देणे आवश्यक असणार आहे , याकरीता अनुपत्राचा नमुना सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे .

तसेच सदर 01 दिवसाचे वेतन कपात करताना ते मुळ वेतन व महागाई भत्ता यांच्या एकुण रकमेच्या आधारे गणना करुन कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment