Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Retirement age 60 years; Brief review ] : सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे बाबत काही संक्षिप्त आढावा या लेखांमध्ये जाणून घेवूयात ..
निवृत्तीचे वय वाढविण्याची आवश्यकता : सध्या राज्य शासनांच्या प्रत्येक विभागांमध्ये कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती देण्यात आलेली आहे . अशांमध्ये जबाबदारीचे काम हे फक्त नियमित कर्मचाऱ्यांनाच देता येते . यामुळे नियमित कर्मचारी उपलब्ध होणे आवश्यक आहे .
सध्या राज्य शासन सेवेत नियमित पदांवर पदभरती केली जात आहे , परंतु प्रमाण हे खुपच कमी असल्याने , सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच अतिरिक्त कामाचा बोजा दिला जातो . याकरीता शासन मार्फत नियमित पदांवर निदान 70 टक्के रिक्त पदांवर पदभरती करणे गरजेचे आहेत .
अन्यथा कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वयांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे . याशिवाय नियमित कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा हा प्रशासन अधिक जलद गतीने सुरु ठेवण्यासाठी फायदेशिर राहील , असा तज्ञांचे मत आहे .
राज्य शासनांच्या केवळ गट ड संवर्गातीलच कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहे , उर्वरित संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहे . यांमध्ये राज्य शासन सेवेत गट ड संवर्गातील पदभरतीच रद्द करण्यात आलेली असल्याने , बहुतांश विभागामध्ये गट ड संवर्गातील पदभरती ही बाह्यस्त्रोत / कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने करण्यात आलेली आहे .
यामुळे जबाबदार पदांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासते , यामुळे उर्वरित संवर्गाचे निवृत्तीचे वय 60 वर्षे करणे सरकारच्या व कर्मचाऱ्यांच्या बाजुने अधिक महत्वपुर्ण आहे .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ( कर्मचारी विषयक ) शासन निर्णय PDF स्वरूपात पुस्तिका फक्त 110/- रुपये मध्ये खरेदी करण्यासाठी Click Here
- आठवा वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी प्रस्ताव तयार ; जाणून घ्या पे-लेव्हल नुसार सुधारित वेतनश्रेणी तक्ता !
- सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पुर्तता करणेबाबत परिपत्रक दि.26.02.2026
- राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी : जुनी पेन्शन लागु करण्याचा कोर्टाचा महाराष्ट्र शासनाला आदेश .. कोर्ट निकाल दि.26.02.2026
- मार्च सुट्ट्यांचा महिना – चक्क 11 दिवस शाळा / महाविद्यालये राहणार बंद ; जाणून घ्या सविस्तर सुट्टी यादी !
- TET संदर्भात न्यायालयाने घेतला आदेश मागे ; शिक्षकांना मोठी अपडेट !