Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Relief fund announced for those affected by crop damage due to heavy rains and floods on the occasion of Diwali ] : दिवाळी सणाच्या निमित्त अतिवृष्टी व पुर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर करणेबाबत , महसुल व वन विभाग मार्फत दिनांक 18.10.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , माहे सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पुर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरीता शेतकऱ्यांना मदत देणेकरीता निश्चित दरानुसार 325856,47,000/- ( अक्षरी – तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छपन्न लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त ) इतका निधी वितरीत करण्यास शासनांची मंजुरी देण्यात आली आहे .
सदरचा निधी हा सुचित केल्याप्रमाणे डी.बी.टी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . सदर मदत निधी देत असताना , व्दिरुक्ती होणार नाही याची तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यांमध्ये नागपुर , अमरावती , पुणे , नाशिक , कोकण या 05 विभागातील नमुद जिल्ह्यातील बाधित शेतीपिकांसाठी मदत निधी जाहीर करण्यात आलेली आहे . जिल्हानिहाय बाधित क्षेत्र व निधीचे वितरण खालीलप्रमाणे पाहु शकता ..

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026