Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Changes in pension rules by the Central Government; New regulations issued! ] : केंद्र सरकार मार्फत पेन्शन नियमांमध्ये महत्वपुर्ण बदल केला आहे , याबाबत नविन नियमावली जारी करण्यात आलेली आहे .
केंद्र सरकार मार्फत जारी केलेल्या नियमावलीनुसार , कर्मचारी व पेन्शन धारक यांच्या मृत्युनंतर त्यांच्या कुटुबांस / मुलांस पेन्शन कधी प्राप्त होईल , याबाबत केंद्र सरकारने खुलासा केला आहे .
सदर सुधारित नियमावली नुसार कर्मचारी / पेन्शन धारकांच्या पश्चात्य पेन्शन प्राप्तीकरीता गोंधळ निर्माण होणार नाही . तसेच यांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांना 02 किंवा त्यापेक्षा अधिक पत्नी आहेत . अशा प्रकरणी निर्माण होणारे वाद कमी होणार आहेत .
कर्मचाऱ्यांच्या मृत्युनंतर त्याच्या मुलांस पेन्शन प्राप्तीचे कोणते अधिकार असतात याचा खुलासा करण्यात आला आहे . सुधारित नियमावली नुसार कर्मचारी / पेन्शन धारकांच्या मृत्युनंतर पेन्शन ही त्याच्या प्रथम जोडीदारास (विधवा / विधुर ) यांना मिळेल .
जर जोडीदार नसतील अशा प्रसंगी पेन्शन ही त्याच्या पात्र मुलांना व तेही नसतील तर त्यांच्यावर अवलंबून असणारे पालक किंवा अपंग भावंड यांना मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
बहुपत्नी असेल अशा प्रसंगी पेन्शन त्यांच्यामध्ये सम प्रमाणात वितरीत केली जाईल , जर पत्नी अपात्र ठरली ( कर्मचाऱ्याच्या / पेन्शन धारकाच्या मृत्युनंतर दुसरे लग्न आदी कारणांमुळे मुलांचा सांभाळ होत नसेल ) तर मुलांना पेन्शनचा हक्क मिळाला आहे .
पेन्शन प्राप्त करणारी विधवा पत्नीने दुसरे लग्न केले असेल , अशा प्रसंगी त्यास पेन्शन मिळणार नाही .
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- आठवा वेतन आयोगांमध्ये असणारे हे 10 मोठे बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
- दि.21 एप्रिल 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.04.2026
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
