Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 02 important Government Decisions (GR) issued on 04.11.2025 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 04.11.2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान कार्ड निर्माण करणे व वितरण करणाऱ्या क्षेत्रिय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दि.04.11.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सुधारित दर पुढीलप्रमाणे असणार आहेत .
| तपशिल | सध्याचे दर | सुधारित मानधन दर |
| प्रति यशस्वी केवायसी | 5/- रु. | 20/-रु. |
| प्रति कार्ड वितरण | 3/-रु. | 10/-रु. |
| एकुण | 8/- रु. | 30/- रु. |
याबाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
02.कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित पदावर समावेशन : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दिनांक 14.03.2024 रोजी 10 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदावर सेवा समायोजन सार्वजनिक आरोग्य विभागातील पदांबरोबर ग्राम विकास विभाग मार्फत भरण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेतील रिक्त पदांवर करण्याचे निर्देश देण्यात आले आले आहेत .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय संकलित PDF पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
हे समायोजन सेवाप्रवेश नियमात दुरुस्ती न करता एक वेळची विशेष बाब म्हणून करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .दिनांक 14.03.2024 रोजी 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेशन केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांना लगतच्या मागील महिन्यांमध्ये प्राप्त होणाऱ्या मानधन एवढे नियमित वेतन श्रेणीतील पुढील टप्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
याबाबतचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
सरकारी / निमसरकारी कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी , पेन्शन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
- सरकारी कर्मचाऱ्यांना या नियमांचे तंतोतंत पालन करावेच लागणार ; अन्यथा गमवावी लागेल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे 03 आर्थिक लाभ ; पगारात होणार वाढ !
- मंत्रीमंडळ निर्णय दि.24.12.2025 : कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 04 मोठे निर्णय ..
- Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025
