Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ after promotion one additional pay scale gr ] : पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन वाढ देणे संदर्भात ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियम 11 नुसार पुढील प्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे . यानुसार नवीन पदावरील नियुक्तीमुळे जुन्या पदाच्या कर्तव्यापेक्षा किंवा जबाबदार यापेक्षा अधिक महत्त्वाची कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या येत असतील , आणि वर्ग दोनच्या ( गट ब ) पदापेक्षा वरच्या दर्जाचे नसलेले पद तो धारण करीत असेल , तर त्याचे वरच्या पदाच्या समय श्रेणीतील प्रारंभिक वेतन हे खालच्या पदाच्या ज्या टप्प्याला त्याचे वेतन असेल ,
त्या टप्प्याला एक वेतन वाढ मिळाल्यानंतर तसेच वेतनमानातील कमाल वेतन येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मागील वेतनवाढी इतकी रक्कम मिळाल्यावर , जे मानव वेतन येईल , त्याच्या पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
यामध्ये पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पद पदाचे व केंद्रप्रमुख पदाचे कामकाज लक्षात घेता पदवीधर प्राथमिक शिक्षक तसेच पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख पदावर पदवृत्ती मिळाल्याच्या नंतर त्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते .
त्यामुळे पदवीधर प्राथमिक शिक्षकास , पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या नंतर पदोन्नती स्वीकारल्याच्यानंतरचे वेतन निश्चिती करताना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील नियम ११ एक तरतुदीनुसार एक वेदरवाढ देऊन त्यांची वेतन निश्चिती करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .
